Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी

Last Updated:

agriculture news : धाराशिवमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी पिकांच्या नुकसान भरपाईला मंजूरी दिली आहे.

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी
अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी
धाराशिव : धाराशिवमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी पिकांच्या नुकसान भरपाईला मंजूरी दिली आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. यामुळे नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांची परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप केले जाणार आहे. राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार 1, 80, 786 शेतकऱ्यांचे 1, 63, 970 हेक्टरवरील एकूण 33 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. आयुक्तांनी तातडीने आकडेवारी जाहीर केली होती. त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागली. परंतु आता राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रस्तावाला मंजूरी दिली असून फक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.
advertisement
दरम्यान, राज्यात अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. प्रामुख्याने, सोयाबीन, कापूस आणि कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मळणीसाठी आलेली सोयाबीन पावसाने ओली झाली असून त्या सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नाही. तसेच कांद्याच्या रोपवाटिका खराब झाल्या आहेत. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement