सरकारने डाव टाकला! जरांगेंचे सरकारवर आरोप, पुढची दिशा काय? थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे आंदोलनस्थळी पोहोचले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? याकडे राज्याचे लक्षं लागले आहे.
नागपूर: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे आंदोलनस्थळी पोहोचले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? याकडे राज्याचे लक्षं लागले आहे.
जरांगेंनी मोठेपणा दाखवला
बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येणं गरजेचे आहे. आंदोलनात प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे तो मी दाखवला. विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.जरांगे यांनी आंदोलनाला येत मोठेपणा दाखवला. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का? हे पाहावं लागणार आहे. मुंबईला जाऊन यश घेऊनच येईल. असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
सरकारने डाव टाकला, जरांगेंचा आरोप
जरांगे म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून येथे आलो आहे. आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक आहे. सरकारने डाव टाकला आहे. सरकारच्या षडयंत्राला प्रत्युत्तर द्यावं लागणार हे कळालं आणि मी नागपूरला निघालो. पुढील दिशा काय असेल? काय केलं पाहिजे हे ठरवायला लागेल.शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतोय. माझा आंदोनलाना पाठिंबा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने कमी मदत दिली. सरकारने शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई द्यावी. सरकारने मदत करण्याची हीच वेळ आहे. सगळे शेतकरी एकत्र यायला हवं, शेतकऱ्यांच्या मागण्यांतील मला ज्ञान नाही.
advertisement
चार महामार्ग ठप्प
बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर परिसरातील चार प्रमुख महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. वाढत्या तणावामुळे हायकोर्टात या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल झाली. कोर्टाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी नागपूर पोलिसांकडे स्वतःहून अटक होण्यासाठी पायी मोर्चा काढला. हजारो आंदोलक त्यांच्यासोबत निघाले आणि या दरम्यान नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
advertisement
मुंबईत बैठक तोडगा निघणार का?
view commentsआज मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने जर सकारात्मक निर्णय घेतला तर हे आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 11:50 AM IST


