शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या! सोयाबीन शेतीला पावसाचा धोका, या तारखेनंतरही मिळणार विमा!

Last Updated:

1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा सोयाबीन काढणीचा काळ मानला जातो. सोयाबीन शेतात काढल्यानंतर पावसाने नुकसान झाल्यासही विम्याची तरतूद आहे.

+
शेतकऱ्यांनो

शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या! या तारखेनंतर सोयाबीनचं नुकसान झाल्यावरही मिळणार विमा!

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: राज्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात मराठवाड्यातील सोयाबीन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचा चिखल झाला असून बळीराजा संकटात आहे. या काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी पीक विमा कंपनीला योग्य ती पूर्वसूचना देण्याची गरज आहे. याबाबत धाराशिवचे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी माहिती दिलीये.
advertisement
सध्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आलेले आहे. परंतु, पावसाच्या पाण्यामुळे मराठवाड्यात त्याचे खून नुकसान झाल्याचे चित्र आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत पीक विमा कंपनीला पूर्वसूचना दिली आहे. तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी 72 तासांच्या आत पीक विमा कंपनीला माहिती देण्याची गरज असते. तरच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात.
advertisement
1 ऑक्टोबरनंतरही पीक विमा मिळणार
1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा सोयाबीन काढणीचा काळ मानला जातो. सोयाबीन शेतात काढल्यानंतर पावसाने नुकसान झाल्यासही विम्याची तरतूद आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना काढणी पश्चातही विमा मिळतो. मात्र, त्यासाठी विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याची गरज असते. शेतकऱ्यांनी वेळेत तशी पूर्वसूचना देण्याची गरज असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी माने यांनी सांगितले.
advertisement
पूर्वसूचना देताना हा पर्याय निवडा
सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी पूर्व सूचना देताना 'Excess Rainfall, Heavy Rainfall किंवा Inundation' हा पर्याय निवडावा. त्यानंतर 'Status of crop at the time of incidence मध्ये Cut & Sprayd हा पर्याय निवडावात्यानंतर नुकसानग्रस्त पिकाचा फोटो, व्हिडिओ अपलोड करावा आणि अर्ज SUBMIT करावा, असेही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, सोयाबीन पिकाचे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील काळातही सोयाबीनला धोका आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरनंतर अशी स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या! सोयाबीन शेतीला पावसाचा धोका, या तारखेनंतरही मिळणार विमा!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement