YouTube वर माहिती पाहिली, डोंगराळ भागात शेतीचं धाडस दाखवलं, वर्षाला 11 लाखांची कमाई

Last Updated:

परमेश्वर थोरात यांनी पाण्याच्या तीव्र टंचाईतही शेतीत नवा प्रयोग करत अव्होकॅडो लागवडीद्वारे यशस्वी मार्ग शोधला आहे.

+
News18

News18

बीड : बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील परमेश्वर आबासाहेब थोरात यांनी पाण्याच्या तीव्र टंचाईतही शेतीत नवा प्रयोग करत अव्होकॅडो लागवडीद्वारे यशस्वी मार्ग शोधला आहे. डोंगराळ भागांतील शेती नेहमीच जोखमीची मानली जाते. वाढते दुर्भिक्ष, अनियमित मान्सून आणि पारंपरिक पिकांचे अस्थिर उत्पादन यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असताना थोरात यांनी नव्या पिकाचा स्वीकार करून परिस्थितीला सकारात्मक वळण दिले.
थोरात यांच्याकडे एकूण पाच एकर शेती असून सुरुवातीला ते संपूर्ण जमिनीत पारंपरिक शेती करत होते. मात्र खर्च वाढत असताना नफा मात्र कमी होत होता. याच काळात त्यांनी यूट्यूबवर अव्होकॅडो फळाबद्दल माहिती पाहिली. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारे आणि बाजारात उच्च किंमत असलेले हे फळ त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या पिकाचा सखोल अभ्यास केला.
advertisement
अभ्यासानंतर थोरात यांनी एक एकर क्षेत्रात अव्होकॅडोची प्रायोगिक लागवड केली. सुरुवातीची काही झाडे चांगली वाढू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. काही वर्षांनी झाडांना फळधारणा सुरू झाली आणि अव्होकॅडोचे उत्पादन बाजारात विक्रीस जाऊ लागले. यामुळे थोरात यांनी या पिकाचे क्षेत्र कायम ठेवण्याचा आणि अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
आज अवघ्या एका एकर अव्होकॅडो शेतीतून परमेश्वर थोरात यांना दरवर्षी 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कमी पाण्यात एवढा मोठा नफा मिळाल्याने हे पीक त्यांच्या डोंगराळ भागातील शेतीसाठी वरदानच ठरले आहे. उर्वरित चार एकरमध्ये त्यांनी पारंपरिक शेती कायम ठेवत उत्पन्नाचे विविध स्त्रोतही सक्षम केले आहेत.
थोरात यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्येही नवीन पिकांचा स्वीकार, आधुनिक माहितीचा वापर आणि बाजारपेठेतील मागणी ओळखल्यास शेतीत आर्थिक स्थैर्य साधता येते, याचे उत्तम उदाहरण अव्होकॅडो शेतीने दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
YouTube वर माहिती पाहिली, डोंगराळ भागात शेतीचं धाडस दाखवलं, वर्षाला 11 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement