‘PM किसान’साठी आधार, शेतकऱ्यांना देण्यात येणार ओळख क्रमांक, काय आहेत नव्या अटी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
PM Kisan Scheme: पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी आता शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच 20 व्या हप्त्यासाठी नियमांत बदल करण्यात आला आहे.
पुणे : शेतकऱ्यांसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. आता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 20 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक देखील बंधनकारक करण्यात आला आहे.
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येत्या 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची ही अट लागू नसेल. सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील 18 वर्षांखालील सदस्यांची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
advertisement
पीएम किसानचे 96 लाख लाभार्थी
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या 96 लाख 67 हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95 लाख 95 हजार इतकी असून अजूनही 78 हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या 95 लाख 16 हजार इतकी आहे. त्यामुळे अद्याप 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही. तसेच बँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 94 लाख 55 हजार असून 1 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार संलग्न नाही.
advertisement
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 20 वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना किसान ओळख क्रमांक घ्यावा लागणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी देखील करावी लागेल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
January 17, 2025 8:50 AM IST


