Soybean Market : सोयाबीनचे भाव का वाढत नाहीत? कोण आहे जबाबदार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Rate Issue : सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून सात आठवडे उलटले आहेत. या पावलामुळे आयात महाग होईल आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्कासारखे कठोर पाऊल उचलूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत.
मुंबई : सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून सात आठवडे उलटले आहेत. या पावलामुळे आयात महाग होईल आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्कासारखे कठोर पाऊल उचलूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत.
तज्ज्ञ लोकांनी भाव न वाढण्यामागचे कारणे सांगितले आहेत त्यातील पहिले कारण म्हणजे सोयाबीनमध्ये असणारा जास्त ओलावा. वास्तविक, सोयाबीन पीक काढणीपूर्वीच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. पाऊस एवढा मुसळधार झाला की शेतमाल पाण्यात भिजला. आता तेच पाणी ओलाव्याच्या स्वरूपात दिसून येत आहे. या ओलाव्यामुळे शासकीय किंवा खासगी खरेदीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. या ओलाव्यामुळे सोयाबीनचे भाव खाली आले असून, त्याचा भाव 4500 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल आहे.
advertisement
भाव का वाढले नाहीत?
NAFED आणि NCCF सारख्या सरकारी संस्थांनी 27000 टनांहून अधिक सोयाबीन खरेदी केले आहे. हा आकडा चार-पाच दिवसांपूर्वीचा आहे, त्यामुळे त्यात थोडी वाढ झाली असावी. मात्र, या खरेदीवर शेतकरी खूश नाहीत कारण त्यांचा दराबाबत आक्षेप असून खरेदी संथ आहे. या वेळी उत्पादन वाढ आणि आयात शुल्क वाढवूनही सोयाबीनच्या दरात वाढ का होत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याला उत्तर देताना तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढला असून मागणी कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनचा भाव एमएसपीपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
advertisement
बाजारांची काय स्थिती आहे?
view commentsबाजारांची स्थिती पाहिल्यास सोयाबीनचा भाव 4892 रुपये प्रति क्विंटल या एमएसपीच्या खाली आहे. ही देखील चिंतेची बाब आहे की, सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढण्याचा हंगाम सुरू असून तो ऑक्टोबरपासून सुरू होऊन डिसेंबरपर्यंत चालतो. अशा स्थितीत या काळात सोयाबीनचे भाव वाढले नाहीत, तर भविष्यात त्याचा फारसा फायदा होईल, असे दिसत नाही. या हंगामात तेलबियांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा असल्याने अलिकडच्या काही महिन्यांत खाद्यतेलाची आयात कमी झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये सोयाबीनचाही समावेश आहे. या आयातीतील घटीचा फायदा सोयाबीनला मिळायला हवा होता, मात्र तो आजतागायत होताना दिसत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2024 4:25 PM IST