मेळघाटमधील महिलांनी सुरू केला सिताफळ रबडीचा व्यवसाय, अनेकांना मिळतोय रोजगार, लोकांकडून चांगला प्रतिसाद Video

Last Updated:

मेळघाटमधील शहापुर येथील स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून सीताफळ रबडीचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात आलाय. जंगलातील सीताफळ गोळा करून आणणे, त्याचा गर काढून खवा मिक्स करून कोणतेही रसायन न वापरता शहापूर येथील महिला रबडी बनवत आहेत.

+
Sitafal

Sitafal Rabdi

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : विदर्भाचे नंदनवन मानले जाणारे मेळघाट हे विवधतेने नटलेले आहे. मेळघाटमधील अनेक नागरिकांनी आता मेळघाटच्या प्रगतीचा वसा हाती घेतलाय. त्यातून नवनवीन व्यवसाय सुरू केले जात आहे. मेळघाटमधील शहापुर येथील स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून सीताफळ रबडीचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात आलाय. जंगलातील सीताफळ गोळा करून आणणे, त्याचा गर काढून खवा मिक्स करून कोणतेही रसायन न वापरता शहापूर येथील महिला रबडी बनवत आहेत. यांच्या या रबडीला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
advertisement
मेळघाटमधील चिखलदरा लगत असलेल्या शहापूर येथील स्फूर्ती क्लस्टरच्या संचालिका मिनाक्षी सुनिल भालेराव यांनी लोकल 18 शी  संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, मेळघाटमधील जंगलात सीताफळाची अनेक झाडे आहेत. या ठिकाणचे आदिवासी कुटुंब जंगलातील सीताफळ गोळा करतात आणि त्याच्या विक्रीसाठी चिखलदरा येथील पॉइंटवर बसतात. पण, सीताफळ कमीत कमी लोकं खरेदी करतात. त्यामुळे आदिवासी महिलांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. म्हणून आम्ही सीताफळ पासून काही तरी वेगळं करायचं असं ठरवलं. तेव्हा आदिवासी महिला सीताफळ गोळा करून आणतात आणि त्यावर प्रक्रिया करून सीताफळ रबडी तयार केली जाते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
सीताफळ रबडी कशी तयार झाली? 
सीताफळपासून काय बनवायचं? म्हणून आम्ही सीताफळमधील बी वेगळे काढून त्याचा गर मशीनमध्ये फेटून घेतला. आमच्याकडे असणाऱ्या मशीनमध्ये तो गर व्यवस्थित फेटला जात नव्हता म्हणून आम्ही नवीन मशीन विकत घेतल्या. त्या मशीनमधून सीताफळाचा गर व्यवस्थित फेटून घेतला आणि त्यात दुधाचा खवा मिक्स केला. त्यापासून सीताफळ रबडी तयार झाली, असे मिनाक्षी भालेराव यांनी सांगितले.
advertisement
किती महिलांना रोजगार मिळतो? 
आदिवासी महिला जंगलातून सीताफळ आणून विक्री करत होत्या. तेव्हा त्यांना कधी तरी नफा मिळत होता किंवा कधी मिळतही नसे. पण आता स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून सीताफळ रबडी तयार करण्याच्या व्यवसायात महिलांना चांगले पैसे मिळत आहेत. त्याचबरोबर नवनवीन बाबी शिकायला मिळत आहेत. जवळपास 200 महिला या व्यवसायात जुळलेल्या आहेत. रबडी बरोबरच आम्ही कुल्फी सुद्धा बनवत आहोत.
advertisement
मेळघाटमध्ये गवळी बांधव सुद्धा भरपूर आहेत. त्यांच्या दुग्ध व्यवसायाला देखील यातून गती मिळाली आहे. आदिवासी बांधव सीताफळ विक्री करतात. त्याचप्रमाणे गवळी बांधव खवा विक्री करतात. त्यांना अमरावतीच्या मार्केटमध्ये जावे लागते. पण, आता सीताफळ रबडी मुळे दोन्ही बांधवांना एकाच ठिकाणी भाव मिळालं आहे. सीताफळ आणि खवा दोन्ही मिळून चवदार रबडी तयार होत आहे. आजूबाजूच्या 3 ते 4 गावातील महिला आमच्या सोबत जुळल्या आहेत, असे मिनाक्षी यांनी सांगितले.
मराठी बातम्या/कृषी/
मेळघाटमधील महिलांनी सुरू केला सिताफळ रबडीचा व्यवसाय, अनेकांना मिळतोय रोजगार, लोकांकडून चांगला प्रतिसाद Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement