Shevga Farming : 795 शेवग्याच्या रोपांची लागवड ठरली फायद्याची, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाख कमाई, सांगितला यशाचा फॉर्म्युला, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अलीकडच्या काळात शेतकरी ऊसाची लागवड न करता आपल्या शेतात विविध प्रकारची पिके घेत आहेत. अभय चौरे हे एक एकर शेवगा शेतीतून वर्षाला 4 लाख कमाई करत आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडच्या काळात शेतकरी ऊसाची लागवड न करता आपल्या शेतात विविध प्रकारची पिके घेत आहेत. असाच नाविन्य प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील तरुण शेतकरी अभय हरिदास चौरे यांनी केला आहे. एक एकर उसाच्या क्षेत्रात त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. तर सर्व खर्च वजा करून अभय चौरे हे एका एकरातून 3 ते 4 लाखांचे उत्पन्न घेत आहेत.
पेनुर येथील तरुण शेतकरी अभय चौरे हे दोन एकरात उसाची लागवड करत होते. दोन वर्षे उसाला सांभाळून देखील त्याचा मोबदला वेळेवर मिळत नव्हता. अभय यांनी कमी दिवसात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आणि शेवग्याची लागवड करायचा निर्णय घेतला. एकरात अभय यांनी 795 शेवग्याच्या रोपांची लागवड केली आहे. अभयांनी त्यांच्या शेतात शेवग्याची बिया लावताना दोन बियांची लागवड केली आहे.
advertisement
ज्या रोपाला चांगले फुले येतात ते शेवग्याचे रोप ठेवून दुसरे रोप काढून टाकले जाते. शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर पाणी कमी आणि शेणखताचा भरपूर वापर अभय यांनी केला आहे. तसेच भेसळ डोस आणि स्लरी टाकले जाते. तसेच प्रत्येक रोगांनुसार या शेवग्याच्या बागेत फवारणी केली जाते. एका एकरात शेवगा लागवडीसाठी अभय यांना 45 तर 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून तरुण शेतकरी अभय चौरे यांना 3 ते 4 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
सध्या बाजारात शेवग्याला 12 ते 15 रुपये भाव मिळत आहे. ज्यावेळेस मद्रास येथून शेवगा येण्यास कमी होतो तेव्हा 100 ते 120 दर शेवग्याला मिळतो. नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात शेवग्याला चांगला दर मिळतो. आणि त्याच काळात अभय चौरे हे त्यांचे शेवग्याची छाटणी करून बाजारात विक्रीसाठी आणतात. जे शेतकरी उसाची लागवड करत आहेत त्यांनी शेवग्याची लागवड केल्यास सहा महिन्यांपासून उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी उसाकडे न बघता प्रयोग म्हणून एका एकरात शेवग्याची लागवड करून एकदा उत्पादन घेऊन बघावे, असे आवाहन तरुण शेतकरी अभय चौरे यांनी केले आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 07, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Shevga Farming : 795 शेवग्याच्या रोपांची लागवड ठरली फायद्याची, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाख कमाई, सांगितला यशाचा फॉर्म्युला, Video