शेतकऱ्यांनी गावात का येऊ दिलं नाही? सदाभाऊ खोतांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण

Last Updated:

Agriculture News : : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

agriculture news
agriculture news
सोलापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, घरे पाण्याखाली आणि रस्त्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच पूरग्रस्त भागांची पाहणी केली असली तरी सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी लोकांच्या भावना प्रखरपणे उफाळून आल्या.
यातील सर्वाधिक गाजलेली घटना म्हणजे माढा तालुक्यातील उंदरगाव येथील. येथे आमदार सदाभाऊ खोत पाहणीसाठी पोहोचले असता ग्रामस्थ संतप्त झाले. गावकऱ्यांनी त्यांना घेराव घालत कठोर प्रश्न विचारले. “आठ दिवस कुठे होता?”, “आत्तापर्यंत गावाकडे का फिरकला नाहीस?” अशा सवालांचा भडीमार खोतांवर करण्यात आला. वाढता रोष पाहून सदाभाऊंना आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने परतावे लागले.
advertisement
ग्रामस्थांचा रोष का वाढला?
गेल्या काही दिवसांपासून गावकरी पाण्यात अडकलेले होते. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत. या काळात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तात्काळ धावून आले नाहीत, अशी ग्रामस्थांची नाराजी होती. त्यामुळे खोत गावात दाखल होताच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.
सदाभाऊ काय म्हणाले?
सदाभाऊ खोत यांनी आपली या बाबत न्यूज १८ लोकमतला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.परंतु या संकटामध्ये आम्ही पाठीशी आहोत.सरकार चांगली मदत करेल. मी लोकवर्गणी मधून मी निवडणूक लढवली आहे.लोकांनी मला मदत केली होती.लोक त्यांच्या भावना मांडत होते. त्यांच्यात रोष होता त्यांच्या व्यथा ऐकून घेणं माझं काम आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सुरू आहे.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनी गावात का येऊ दिलं नाही? सदाभाऊ खोतांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement