WhatsApp update: स्टेटस आवडलं लगेच 'ढापलं', WhatsApp वर मिळणार नवीन फीचर, कसं वापरायचं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
WhatsApp वर नवीन फीचरमुळे युजर्सना स्टेटस शेअर आणि कंट्रोल करता येणार आहे. Meta हे फीचर अँड्रॉइडवर आणणार असून WABetaInfo ने टेस्टिंग सुरू केलं आहे.
फेसबुक किंवा इन्स्टावर कसं एखाद्याची स्टोरी किंवा स्टेटस आवडलं की लगेच रिशेअर करता येतं किंवा डाऊनलोड करता येतं, मात्र WhatsApp अजूनही एखादं स्टेटस आवडलं की त्या व्यक्तीकडून ते मागून घ्यावं लागतं. ते डाउनलोड करण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागतो. मात्र आता हा त्रास संपणार आहे. WhatsApp वर तुम्हाला आवडलेलं स्टेटस तुम्ही अगदी सहज ढापू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणाकडे ते मागायची गरज पडणार नाही.
advertisement
WhatsApp स्टेटसबाबत कंपनीने मोठी अपडेट दिली आहे. सध्या एका नव्या फीचरवर कंपनी काम करत आहे. हे फीचर अँड्रॉइड अॅपवर मिळणार आहे. स्टेटसवर जास्त कंट्रोल असेल असं कंपनीचं म्हणणं आहे. मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवर खास फीचर अॅड करणार आहे. आता तुम्ही एकाच वेळी फेसबुक आणि WhatsApp वर देखील स्टेटस शेअर करु शकणार आहात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement