Bhiwandi Municipal Election : भिवंडी महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? BJP काँग्रेसचा आणखी एक गड हिसकावणार?

Last Updated:

भिवंडी महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदार पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी 2026 ला लागणार आहे. भिवंडी महापालिकेवर आतापर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहीलं आहे.

Bhiwandi Municipal Election 2026
Bhiwandi Municipal Election 2026
Bhiwandi Municipal Election 2026 : भिवंडी महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदार पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी 2026 ला लागणार आहे. भिवंडी महापालिकेवर आतापर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहीलं आहे. पण यंदाच्या निवडणुकीत काँग्रसेचा आपला गड कायम राखणार की भाजप हा गड हिसकावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
भिवंडी महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती (SC) 3 जागा त्यापैकी 2 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) 1 सर्वसाधारण ST जागा आरक्षित आहे. मागासवर्ग प्रवर्ग (OBC) 24 जागा आहेत.त्यातील 12 जागा OBC महिला यांच्यासाठी राखीव असणार आहे. सर्वसाधारण (Open) - 62 जागा, त्यातील 31 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत.
advertisement
भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसने 47 जागा मिळवणून काँग्रेसने बहुमत संपादन केलं होतं. तर भाजपने 20,शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी 4, समाजवादीचा पक्षाला 2 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळवले होते. त्याबदल्यात काँग्रेसने शिवसेनेला उप महापौरपद ही दिले होते. त्यामुळे भाजप आणि कोणार्क महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर रहावे लागले होते.
advertisement
सध्याच राजकारण काय?
भिवंडी महानगरपालिकेत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष काँग्रेसने व्होटबँक आणि पर्यायाने महानगरपालिकेवर वर्चस्व राखले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 47 जागांवर विजय मिळवला होता. अलिकडच्या काळात काँग्रेसची ताकद कमी झाल्याने पक्षाची वाताहत झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी एमआयएम आणि अन्य पक्षांचा रस्ता धरला होता. पण तरीही काँग्रेस पक्षाचा जनाधार संपलेला नाही. तसेच गेल्या काही वर्षात येथे भाजपने आपली ताकद वाढवली आहे.त्यासोबत शिवसेनेच आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
भिवंडी महानगरपालिकेचा 2017 चा पक्षनिहाय निकाल
एकूण जागा 90
काँग्रेस 47
भाजप 19
शिवसेना 12
समाजवादी पक्ष 2
कोणार्क आघाडी 4
इतर 10
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Bhiwandi Municipal Election : भिवंडी महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? BJP काँग्रेसचा आणखी एक गड हिसकावणार?
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement