कधी पाहिली का 3 फुटांची म्हैस, राधाची किंमती ऐकून व्हाल हैराण
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Smallest Buffalo: सोलापुरातील कृषी प्रदर्शनात 3 फुटांची म्हैस सर्वांचं लक्ष वेधतेय. विशेष म्हणजे ही बुटकी म्हैस साडेतीन लाखांची आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर – यंदा सोलापुरात 54 वे श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात फक्त 3 फूट उंचीची बुटकी राधा म्हैस सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. या म्हशीची उंची फक्त 3 फूट तर लांबी 6 फूट असून वय 2 वर्षे 9 महिने आहे. विशेष म्हणजे या म्हशीची किंमत तब्बल साडेतीन लाख रुपये आहे. राधा ही जगातील सर्वात लहान म्हैस असल्याचा दावा शेतकरी अनिकेत बोराटे यांनी केला आहे.
advertisement
शेतकरी अनिकेत बोराटे हे म्हशीचे मालक आहेत. ते मुळचे सातारा जिल्ह्यातील माणचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडे या राधा म्हशीचा जन्म झाला. जन्मापासून या म्हशीची उंची वाढलीच नाही. ती केवळ तीन फूट उंचीची आहे. तर लांबी जेमतेम 6 फूट आहे. ही मुर्रा जातीची म्हैस आहे. या म्हशीची जात पंजाब हरियाणा या भागात आढळतात. पण या म्हशीचा जन्म साताऱ्यात झाला. सुरुवातीपासूनच राधा वेगळी वाटत होती. तिचं वय वाढत गेलं पण तिची उंची मात्र तेवढीच राहीली. तिचे वय आता दोन वर्ष नऊ महिने असल्याचं बोराटे सांगतात.
advertisement
म्हैस विकणार नाही
सोलापूर शहरातील होम मैदानावर हे कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये ही राधा बुटकी म्हैस सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. कृषी प्रदर्शनातील या लाडक्या राधाला तब्बल साडेतीन लाख रुपयांना विकतही मागण्यात आलं आहे. त्यातूनत अनेक जण तिला विकत घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र कितीही किंमत आली तरी आम्ही राधाला विकणार नसल्याचं तिचे मालक अनिकेत बोराटे यांनी सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 23, 2024 6:10 PM IST