Soyabean Market : दिवाळीनिमित्त 3 नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन खरेदी राहणार बंद, सध्याचे बाजारभाव काय?

Last Updated:

agriculture news : शेतकरी दिवाळीच्या कालावधीत आर्थिक गरज भागवण्यासाठी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहेत. परंतु राज्यातील बहुतांश बाजार समित्या या दिवाळीनिमित्त 3 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना 1 आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव काय?
सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव काय?
अकोला : राज्यभरात दिवाळीची धामधुम सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेतकरी दिवाळीच्या कालावधीत आर्थिक गरज भागवण्यासाठी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहेत. परंतु राज्यातील बहुतांश बाजार समित्या या दिवाळीनिमित्त 3 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना 1 आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या आठवडाभरापासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे. अकोल्यामध्ये पाच हजार क्विंटलवर आवक पोहोचली होती. खामगाव, चिखली, वाशिम, कारंजा, मूर्तीजापूर, मलकापूर, चिखली आणि मेहकर या बाजारपेठांमध्ये आवकेने उच्चांक गाठण्यास सुरवात केली होती.
सध्या सोयाबीनचे दर काय?
महाराष्ट्र राज्य कृषि व पनण महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (29 ऑक्टोबर) रोजी पिवळा, लोकल आणि हायब्रिड या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक पाहायला मिळाली. हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 12751 क्विंटल झाली आहे. तर त्याला कमीत कमी 2800 रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त दर हा 4540 प्रति क्विंटल मिळाला आहे. तर सर्वसाधारण दर हा 3 हजार 500 रुपये मिळाला आहे.
advertisement
सोमवारी दीड लाख क्विंटलची आवक झाली
सोमवारी वासुबारस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी बाजार पेठांमध्ये सोयाबीनच्या आवकेत मोठी वाढ झाली होती. राज्यभरातील बाजार समितीमध्ये 1 लाख 52 हजार 438 क्विंटलची आवक झाली होती. एकूणच दिवाळीसाठी पैसे लागतात यासाठी शेतकरी सोयबीनची विक्री करण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Market : दिवाळीनिमित्त 3 नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन खरेदी राहणार बंद, सध्याचे बाजारभाव काय?
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement