बायोगॅस प्रकल्प सुरू करायचाय? सरकार देतंय अनुदान, ही लागतील कागदपत्रे, लगेच करा अर्ज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
या योजनांचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना देखील होत असतो. अशीच एक योजना म्हणजे नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन ही योजना सरकारकडून चालविण्यात येते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सरकार नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतं. या योजनांचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना देखील होत असतो. अशीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन ही योजना सरकारकडून चालविण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जातं. या योजने विषयीच अधिक माहिती कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद प्रकाश पाटील यांनी दिली आहे.
advertisement
काय आहेत अटी?
ही योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना बायोगॅस सुरू करायचा आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान हे दिले जातं. पण ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा देखील होणार आहे.
advertisement
शेतकऱ्यांकडे किमान दोन ते तीन तरी पशुधन असावं. यासाठी सरकारकडून अनुसूचित जाती जमातीसाठी 22 हजार रुपये एवढे अनुदान आहे. जनरल कॅटेगिरीसाठी 14 हजार 350 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यासोबतच जिल्हास्तरावरील देखील 10 हजार रुपयांचा अनुदान आहे देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पशु पर्यवेक्षक यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. एवढे कागदपत्रे हे लागणार आहेत.
advertisement
तुम्हाला सुद्धा जर बायोगॅस प्रकल्प सुरू करायचं असेल तर तुम्ही यासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागामध्ये किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता आणि यातून अनुदान मिळू शकता. हा सुरु करण्यामागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त बायोगॅस निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचा जो गॅस वरचा खर्च आहे तो देखील कमी होईल यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रकाश पाटील यांनी केलेले आहे.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 29, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
बायोगॅस प्रकल्प सुरू करायचाय? सरकार देतंय अनुदान, ही लागतील कागदपत्रे, लगेच करा अर्ज







