पीकं पाण्यात, संसार उद्ध्वस्त! उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Uddhav Thackeray : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, २७ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, २७ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले असून शेतांमधून सडलेल्या पिकांचा वास येतोय. अशा स्थितीत शेतकरी मदतीसाठी आर्त हाक देत आहेत. मात्र सरकारची मदत अपुरी, तुटपुंजी आणि केवळ दिखाऊ आहे.”
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आम्ही जशी एकदा कर्जमाफी झाली होती, तशी पुन्हा करून द्या” अशी मागणी केली. मात्र, सरकारकडून जाहीर झालेली ८ हजार रुपयांची हेक्टरी मदत ही फक्त जमीन साफ करण्यासाठी पुरेल, त्यातून खरी भरपाई होणार नाही. पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीसह भरीव मदत करणे आवश्यक आहे,” असे ठाकरे म्हणाले.
advertisement
शेतकऱ्यामागे पोलीस लावले
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे गरजेचे आहे.यादी सरकारकडून १४,००० कोटींची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही.मुख्यमंत्री यांना एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर शेतकऱ्यामागे पोलिस लावले.
पंजाब सरकारचे कौतुक
उद्धव ठाकरे यांनी पंजाब सरकारचे कौतुक केले आहे.ते म्हणाले की, पंजाबच्या सरकारने जशी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर केली याला म्हणतात सरकार. तशीच महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात यावी. मी मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि ५० हजारांची मदत द्यावी. ज्या साखर कारखान्यांनी पैसे थकवले आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत.बायकोचे मंगळसुत्र गहाण ठेवून शेतकरी कर्ज काढतात. त्या मंगळसूत्राची सरकारला किती किंमत आहे? हे बघूच! असंही ठाकरे यांनी म्हंटले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पीकं पाण्यात, संसार उद्ध्वस्त! उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या?