Buldhana News: तीन पानी सुसाईड नोट लिहिली अन् शासन पुरस्कार प्राप्त युवा शेतकऱ्याने संपवलं जीवन! नेमकं कारण काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त तरुण शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .तसेच त्याने तीन पानी सुसाईड नोट देखील लिहिली आहे. खडकपूर्णातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे. विषारी औषध प्राशन करत तरुणाने आपले जीवन संपवले आहे.
बुलढाणा : शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त तरुण शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .तसेच त्याने तीन पानी सुसाईड नोट देखील लिहिली आहे. खडकपूर्णातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे. विषारी औषध पिवून तरुणाने आपले जीवन संपवले आहे.
कैलास नागरे असं या शेतकऱ्याचे नाव असून त्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव रागा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता.मात्र मागणी पूर्ण न झाल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे.
कैलास नागरे यांना नुकताच राज्य शासनाचा युवा प्रगतशील शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता. तसेच तो परिसरातील लोकांना आधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण देत होता.शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी त्याने लढा उभारला होता.अनेकदा आंदोलनही केली होती. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.सदर घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतीसाठी पाणी न मिळाल्याने हताश होऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. कैलास नागरे हे परिसरातील अत्यंत लोकप्रिय आणि कष्टाळू शेतकरी असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
शेतकऱ्यांनी पालकमंत्री अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ठोस निर्णय जाहीर करेपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना सोपवण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो शेतकरी एकत्र येऊन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
advertisement
पोलीस तैनात, वातावरण तणावपूर्ण
कैलास नागरे यांनी आपले जीवन संपवल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Buldhana News: तीन पानी सुसाईड नोट लिहिली अन् शासन पुरस्कार प्राप्त युवा शेतकऱ्याने संपवलं जीवन! नेमकं कारण काय?









