पुणे विभागाला 283 कोटींचा निधी, अहिल्यानगरला सर्वाधिक वाटा
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुणे विभागासाठी मागील हंगामात एकूण २८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यामध्ये फक्त अहिल्यानगर जिल्ह्यालाच 159 कोटी 21 लाख 54 हजार 424 रुपयांची भरपाई मिळाली. यामध्ये सर्वाधिक रक्कम नेवासा तालुक्याच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय भरपाईचा तपशील
advertisement
तालुका भरपाई रक्कम (₹)
नेवासा 46,52,21,338
शेवगाव 31,53,78,770
राहुरी 17,04,12,691
श्रीरामपूर 10,05,89,864
कोपरगाव 10,62,80,313
राहाता 7,13,56,908
जामखेड 7,04,76,058
श्रीगोंदा 6,26,55,439
पाथर्डी 1,36,94,072
अकोले 77,01,616
पारनेर 80,35,323
कर्जत 1,41,89,033
संगमनेर 1,81,75,222
अहिल्यानगर 4,47,41,576
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
विशेषतः नेवासा, शेवगाव आणि राहुरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. केवळ नेवासा तालुक्यातच 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील 44 हजार 243 शेतकऱ्यांना एकट्या 46 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. यापैकी 90% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाली आहे. याशिवाय पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 6,757 शेतकऱ्यांना 1 कोटी 62 लाखांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
खरीपपूर्व कामांना गती
या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढले असून बियाणे, खते आणि मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रशासनाकडून वेळेवर निधी वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
