या स्टॉलवर विविध प्रकारच्या कापडी टोट बॅग्स, गिफ्ट बॅग्स, डेनिम बॅग्स, बॉटल्स बॅग्स आणि टिफिन बॅग्स उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व बॅग्स ट्रेंडिंग डिझाईन, आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये मिळतात. कथ्थक नृत्यप्रेमींसाठी खास घुंगरू प्रिंट असलेली कापडी टोट बॅग 300 रुपयांना उपलब्ध असून ती विशेष लोकप्रिय ठरत आहे. याचबरोबर डबल पॉकेट टोट बॅग 300 रुपये, तर हिमालय थीमवरील बॅग अवघ्या 60 रुपयांना मिळत आहे.
advertisement
वय 6 वर्ष, पुण्यातील मिहिराने रचला इतिहास, बनली भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर
लहान बाजारपेठा, कार्यक्रम किंवा भेटवस्तू देण्यासाठी लागणाऱ्या साध्या कापडी गिफ्ट बॅग्स 10 रुपयांपासून उपलब्ध आहेत. लेस लावलेली आकर्षक कापडी बॅग 250 रुपयांना, तर हळदी-कुंकवासाठी वापरण्यात येणारी लहान कापडी बॅग फक्त 60 रुपयांना मिळते. डेनिम बॅग्सची किंमत 80 रुपये, बॉटल्स बॅग 50 रुपये आणि टिफिन बॅग 100 रुपयांना उपलब्ध आहे.
या स्टॉलवर प्लेन टोट बॅग्स देखील विक्रीस असून त्यावर ग्राहक स्वतः चित्र काढू शकतात किंवा प्रिंट करून घेऊ शकतात. विशेष म्हणजे येथे सर्व बॅग्स होलसेल दरात मिळतात. मात्र त्यासाठी किमान 12 पीस खरेदी करणे आवश्यक आहे.
विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या बॅग्स पर्यावरणपूरक असल्याने प्लास्टिक बॅग्सना उत्तम पर्याय ठरत आहेत. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर या बॅग्सची खरेदी करत आहेत. कमी किमतीत दर्जेदार आणि टिकाऊ पर्याय उपलब्ध करून देणारा हा स्टॉल दादर परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.





