कारळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
कारळे, जिरे, तीळ, भाजलेले सुके खोबरे, लसूण, कोथिंबीर, लाल मिरची, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, चवदार आणि हेल्दी मेथी पराठा, रेसिपीचा संपूर्ण Video
कारळ्याची चटणी कृती
आज आपण जेवणासोबत खाल्ली जाणारी पारंपरिक आणि आरोग्यदायी कारळ्याची चटणी तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. सुरुवातीला एक वाटी कारळे भाजून त्यात थोडे जिरे टाकावे, जे कारळ्याबरोबर हलक्या आचेवर भाजले जातील. भाजलेले कारळे आणि जिरे कॉटनच्या कापडावर पसरवून थोडे थंड होऊ द्या.
advertisement
त्यानंतर दोन टेबलस्पून भाजलेले तीळ घालून मिक्सरमध्ये अर्धवट बारीक करून प्लेटमध्ये काढा. नंतर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, 7-8 लसूण पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात आधी तयार केलेले कारळे, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून पुन्हा चांगले मिक्स करा. तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ल्यास ती अत्यंत चविष्ट लागते. कारळे केवळ चव वाढवणारे नाहीत, त्याचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणात फायदे आहेत.





