धाराशिव - अनेक जण आज उच्चशिक्षित असूनही शेती करण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच त्यात यशस्वीसुद्धा होत आहेत. आज अशाच एका तरुण शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवले आहे.
किशोर कारकर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील रहिवासी आहेत. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले किशोर कारकर यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत केळी, पेरू, ड्रॅगन फ्रुट, आणि गोल्डन सिताफळची लागवड केली. यातून ते वर्षाकाठी लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
किशोर कारकर यांनी बीसीएचे शिक्षण घेतले. त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती की मुलाने चांगल्या पगाराची नोकरी करावी. मात्र, किशोर यांनी अत्याधुनिक शेती करण्याचा विचार केला आणि बीसीए नंतरचे शिक्षण थांबवून त्यांनी अत्याधुनिक शेती सुरू केली.
Satara : शेतीची आवड, प्राचार्य पदाचा राजीनामा, तैवान पिंक पेरुतून घेतले लाखोंचे उत्पन्न
किशोर कारकर हे गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक शेती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेतामध्ये 2.5 एकर केळी, 10 एकर गोल्डन सिताफळ, 2 एकर पेरू आणि अडीच एकर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. तसेच सध्या एक एकराच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतातून त्यांना 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. आणखी दीड एकर ड्रॅगन फ्रुट लवकरच तोडणीला येणार आहे.
एकेकाळी शिक्षण घेऊन आपल्या मुलाने चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी ही घरच्यांची अपेक्षा होती. मात्र, त्याहून अधिक सक्षम पद्धतीने किशोर कारकर हे शेती करत आहेत आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.