पुणे : एआयचा वापर हा आज सर्वच क्षेत्रात केला जात असून त्या माध्यमातून ते काम अधिक सोपे झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती शक्य आहे. ही बाब बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या साह्याने सिद्ध करून दाखविली आहे. कृषी क्षेत्रात अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत 'एआय'च्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी उसाची शेती विकसित करण्याचा प्रयोग बारामतीत प्रत्यक्षात आला आहे.
advertisement
पारंपारिक शेती करताना पाण्यासंदर्भात अनेक अडचणी येत असतात. पाण्याचा अतिवापर, खतांचा होणारा मारा यामुळे उत्पादकता न वाढता जमिनीची सुपीकता देखील कमी होत आहे. हे नियंत्रित आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत ऊस शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापर करता येणार आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे कृषी विज्ञान केंद्रामध्ये वॉर रूम करण्यात आली असून त्याद्वारे सर्व प्रक्षेत्रातील प्रयोगाचे संकलन केले जात आहे.
बीडच्या शेतकऱ्याचा काकडी लागवडीचा यशस्वी प्रगोय, एक एकरमध्ये कमावला तब्बल 3 लाख रुपयांचा नफा, Video
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेन्सरद्वारे या ऊस शेतीमध्ये नेमकी किती पाण्याची आवश्यकता आहे. कोणत्या भागामध्ये कोणत्या खतांची कमतरता आहे, त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी पाणी किती प्रमाणात आवश्यक आहे, यासह हवामानातील बदल, वाऱ्यातील बदल व रोग किडीविषयीचे अनुमान यांचा अचूक अंदाज केला जात आहे.
शेतकऱ्याचा होणारा अवाजवी खर्च कमी होऊन उत्पादन वाढ तसेच मातीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील 1 हजार ऊस शेती करणारे प्रगतीशील शेतकरी याच्या एक एकर क्षेत्रावर हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यांना वेदर स्टेशन, सॅटेलाईट सपोर्ट आणि सेन्सरद्वारे त्याचे प्रतिनिधित्व करून त्याचा डेटा घेऊन या प्रयोगामध्ये त्याचा वापर हा केला जात आहे. त्या डेटा मार्फत मिळणाऱ्या माहितीद्वारे त्यांना सल्ला हा दिला जातो. या तंत्रज्ञानाद्वारे 50 टक्के फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे, अशी माहिती डॉ. योगेश पाटके यांनी दिली आहे.