गोलवाल यांनी त्यांच्या शेतातील मोसंबीवर वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 एकर क्षेत्रात बारा बाय बारा फुटावर मोसंबी या फळाची लागवड केलेली आहे. तसेच या शेतीतून मोसंबीचे चांगले उत्पादन मिळावे म्हणून ते शेणखताचा वापर करतात. फळाची गळती सुरू झाल्यास शेतीची मशागत कमी करायची, मशागत जास्त प्रमाणात केली तर काही प्रमाणात फळाची गळ होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फळ दर्जेदार आल्याने चांगला भाव मिळेल आणि यातून समाधानकारक उत्पन्न मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
advertisement
Marigold Farming: शेतकऱ्यानं शोधला पैशाचा फॉर्म्युला, 20 गुंठ्यात लावला झेंडू, कमाई लाखात!
मोसंबी फळावर पाहिले तर जास्त प्रमाणात कोळी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या कोळी रोगापासून फळाचा बचाव करण्यासाठी कीटकनाशक तसेच बुरशीनाशक वापरावे लागते. नवीन शेतकऱ्यांना मोसंबी शेती करायची असल्यास सर्वप्रथम मोसंबी शेतीची संपूर्ण माहिती घ्यायची. त्याबरोबरच चांगले रोप निवडणे देखील हे गरजेचे आहे. क्षेत्रानुसार आणि पाण्याचे नियोजन करून लागवड करावी असा सल्ला देण्यात आला आहे.
गोलवाल यांच्याकडे 16 वर्षांपूर्वीचे काही झाडे आहेत, त्या झाडांची निवड करून आणि त्याचा अभ्यास करून घरीच कलम तयार करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या शेतात लागवड केलेल्या मोसंबीच्या झाडांची रोपे देखील त्यांनीच तयार केले असल्याचे सांगितले आहे.