Marigold Farming: शेतकऱ्यानं शोधला पैशाचा फॉर्म्युला, 20 गुंठ्यात लावला झेंडू, कमाई लाखात!

Last Updated:
Marigold Farming: मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने झेंडूच्या फुलांची शेती केलीये.
1/7
मराठवाडा तसा दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. परंतु, अलिकडच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतात वेगळे प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे यातून त्यांना बक्कळ उत्पन्न देखील मिळत आहे. असाच प्रयोग छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने केला आणि आपल्या शेतात झेंडूची शेती केली. आता यातून लाखोंची कमाई होतेय.

advertisement
2/7
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हसनाबादवाडी येथील शेतकरी हरिदास गाडेकर यांनी देखील आपल्या शेतात फुलशेतीचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगामुळे गेल्या सतरा वर्षांपासून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.

3/7
हरिदास गाडेकर यांनी 20 गुंठे क्षेत्रात 'अष्टगंधा' आणि 'पितांबरी' वाणाचा झेंडू लावला आहे. सध्या त्यांची फुलशेती बहरली असून फुलांची दररोज विक्री सुरू आहे. या फुलशेतीतून 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती गाडेकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

4/7
फुलांच्या शेतीतून बाराही महिने उत्पादन घेता येतं. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत गाडेकर हे विविध फुलांची शेती करतात. त्यांच्याकडे विहीर असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे बारमाही शेती करता येते, असंही ते सांगतात.

5/7
झेंडूची लागवड ही समान्यपणे मे आणि जूनमध्ये केली जाते. फुलांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास 'डेलिकेट', 'आकाया' आणि 'प्राईड' या कीटकनाशकांची फवारणी करता येते. याशिवाय फुलांवर बुरशी देखील लागते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बुरशीचा जास्त परिणाम फुलांवर झालेला नाही.

6/7
फुलांची शेती ही फायद्याची ठरते. त्यामुळे जे शेतकरी अशी शेती करण्याचा विचार करत असतील त्यांनी आधी फुलांची आणि देखभालीची माहिती घ्यावी. झेंडू असो किंवा इतर फुलझाडं त्यांची लागवड दाट केली तर बुरशीचा सामना करावा लागत नाही.

7/7
फुलांची लागवड शक्यतो जूनमध्येच करायला हवी. उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यास ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली तरी देखील चालते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे फुल शेतीतून समाधानकारक पैसे मिळतात, असेही गाडेकर सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement