गाढे जळगाव येथील नारायण ठोंबरे यांना पारंपरिक पिकामधील ज्वारी, बाजरी आणि कपाशी ही पिके परवडत नसल्याने वेगळे वाण निवडण्याचा निर्णय घेतला आणि 15 जानेवारी 2024 मध्ये अर्धा एकर शेतामध्ये 350 पपई झाडांची लागवड केली. तसेच पपईच्या एका झाडाला 80 ते 90 किलो फळ निघते. आतापर्यंत दहा टनहून अधिक फळ विक्री केलेले आहे. दीड लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखी दीड लाख म्हणजे एकूण 3 लाख रुपयांचे उत्पन्न ठोंबरे यांना मिळणार आहे.
advertisement
आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला
पपई लागवड कशी करावी?
पपई लागवडीपासून शेतीला रासायनिक खत, ठिबक यासह अन्य प्रकारचा एकूण 50 हजार रुपये खर्च लागला आहे. तसेच शेतकऱ्यांना नवीन पपईचा प्रयोग लागवड करायचा झाल्यास पपई झाडांची पाच बाय आठ, आठ बाय नऊवर लागवड करता येते. तसेच हे एका एकरमध्ये 1 हजार झाडे देखील लावता येतात. आपल्या लागवडीच्या क्षेत्रानुसार झाडांची संख्या बसते. इतर शेतकऱ्यांनी देखील पपईचा बाग केला पाहिजे त्यामुळे नुकसान कमी होते आणि उत्पन्न वाढते, असे आवाहन देखील ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.





