सोलापूर : आज शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत आहेत. वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी हे अतिशय गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे शेतकरी पण कमी क्षेत्रात कसं जास्त उत्पन्न घेता येईल असे नव नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रंगनाथ पुडलिक गावडे यांनी 15 गुंठ्यांत घेवडा लागवडीतून पहिल्या तोड्यात तब्बल 2 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे.
advertisement
रंगनाथ पुडलिक गावडे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील राहणारे आहेत. रंगनाथ यांनी त्यांच्या शेतात प्रयोग करत पहिल्यांदाच घेवड्याची लागवड केली आहे. 6 फुटांवर बेड पाडून मशागत करून गावखत भरून ड्रिप टाकून घेवड्याची लागवड केली आहे. रंगनाथ हे आधी 15 गुंठ्यांत दोडक्याची शेती करत होते. एका तोड्याला 700 ते 750 किलो घेवडा निघत होता.
सांगलीच्या पिता-पुत्राची कमाल, एकरी घेतलं तब्बल 158 टन उसाचे उत्पादन, अख्खं गाव पाहत राहिलं!
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घेवड्याला 60 ते 65 रूपये प्रति किलो दर मिळत आहे. तर या घेवडा विक्रीतून रंगनाथ यांनी 2 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. महाराष्ट्रात सोलापूर पुणे, सातारा, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. भाजीपाला शेतीतून बरेच शेतकरी चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढत आहेत. काहीजण आधुनिक तंत्रज्ञांन पद्धतीने भरगोस उत्पन्न काढतात, तर कोठे सेंद्रिय पद्धतीने अधिक उत्पन्न काढून पैसे मिळवले जातात.
शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आर्धा एकर ते एक एकर शेतात घेवड्याची लागवड करावी. या घेवडा विक्रीतून घर खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च कोणताही खर्च असा या घेवडा विक्रीच्या माध्यमातून काढता येतो. उसापेक्षा शेतकऱ्याने घेवड्याची लागवड करावी, असे आवाहन बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी रंगनाथ गावडे यांनी केले आहे.