शेतकरी रविंद्र मेटकर सांगतात की, ताक, अंडी, चुना, तुरटी आणि गूळ या सर्व पदार्थांत आवश्यक ते गुणधर्म आहेत. अंड्यांमध्ये अमिनो ऍसिड आणि प्रोटीन असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होते. ताक हे बुरशीनाशक असल्यामुळे पिकांना बुरशी लागत नाही. तुरटी ही जंतुनाशक असल्यामुळे पिकांना कीड लागत नाही. चुन्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळे पिकांना कॅल्शियम मिळते. या सर्व मिश्रणामध्ये जे किटाणू तयार होतात, त्या किटाणूंना खाद्य मिळावे यासाठी या मिश्रणात गूळ देखील आवश्यक आहे.
advertisement
पंच्यामृत बनवण्यासाठी साहित्य
12 अंडी, दीड लिटर ताक, 100 ग्राम गुळ, 100 ग्राम चुना, 100 ग्राम तुरटी
पंच्यामृत बनवण्याची कृती
हे सर्व साहित्य एका मोठ्या बॉटलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यांनतर 10 ते 12 दिवस मिक्स करून ठेवायचं आहे. ही बॉटल सावलीमध्ये ठेवायची आहे. दररोज हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 दिवसांनंतर तुम्ही शेतात हे वापरू शकता. त्यानंतर फवारणी करताना 500 मिली मिश्रण 20 लिटर पाण्यात टाकून त्याचा एक पंप औषध तयार होते. 1 एकर शेतीसाठी 80 लिटर पाणी वापरावे लागेल, असे याचे प्रमाण आहे.
पंचामृत वापरल्यास होणारे फायदे
1. शेतीच्या उत्पन्नात वाढ होते.
2. जंगली जनावरांपासून संरक्षण होते.
3. पूर्णतः सेंद्रिय शेती करण्यास मदत होते.
4. कमीत कमी खर्चात पिकाची व्यवस्थित देखरेख होते.
कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा हे पंचामृत वापरल्याने होतो, असे शेतकरी रविंद्र मेटकर सांगतात.





