मोहोळ तालुक्यातील शिवतेज गायकवाड यांचे शिक्षण बी. एस. ऍग्री पर्यंत झाले असून डिसेंबर 2024 मध्ये शिवतेजने दोन एकरात केळीची लागवड केली होती. जवळपास 3 हजार केळीची रोपे दोन एकरात लागवड केली होती. उन्हाळ्यामध्ये बागेला पाणी कमी पडत असल्याने शिवतेज यांनी टँकरद्वारे पाणी आणून केळीची बाग जगवली.
Success Story : बारावीपास शेतकऱ्यानं लावलं डोकं, एका एकरात घेतलं दुहेरी पिक, उत्पन्न मिळणार लाखात
advertisement
उन्हाळ्यात केळीच्या बागेला टँकरद्वारे 70 ते 80 हजार रुपयांचे पाणी आणून तळ्यामध्ये साठवून पाण्याचे नियोजन केलं होतं. तसेच केळी लागवडी करत असताना मशागत, केळीची बांधणी, रोग पडू नये म्हणून वेळोवेळी फवारणी सुद्धा केली होती. दोन एकरात केळी लागवडीसाठी चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च शिवतेज गायकवाड यांना आला होता.
सध्या बाजारात केळीला दोन ते चार रुपये किलो प्रमाणे दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. केळीचे भाव घसरल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरुण शेतकरी शिवतेज गायकवाड यांना या केळीच्या बागेतून एकरी दीड लाख म्हणजेच जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.





