Success Story : बारावीपास शेतकऱ्यानं लावलं डोकं, एका एकरात घेतलं दुहेरी पिक, उत्पन्न मिळणार लाखात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले रेवसिद्ध शेळके यांनी असाच प्रयोग केला आहे. एका एकरात चेक नेट बोरांची बाग केली असून त्यामध्ये कांद्याचं आंतरपीक घेतले आहे.
सोलापूर : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले रेवसिद्ध शेळके यांनी असाच प्रयोग केला आहे. एका एकरात चेक नेट बोरांची बाग केली असून त्यामध्ये कांद्याचं आंतरपीक घेतले आहे. ही कल्पना कशी सुचली, लागवडीसाठी खर्च किती आला आणि किती नफा मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी रेवणसिद्ध शेळके यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
कोन्हेरी गावातील बारावीपर्यंत शिक्षण शिकलेल्या रेवणसिद्ध शेळके यांनी या आधी एका एकरात उमरान आणि चमेलीच्या बोरांची बाग केली होती. पण या बोरांना योग्य दर मिळत नसल्याने रेवणसिद्ध यांनी उमरान आणि चमेली या झाडांची कलम करून त्यामध्ये बाजारात नवीन आलेली चेकनेट बोरांची रोप आणून कलम केलेल्या बोरांच्या झाडांमध्ये लागवड केली. सध्या बाजारात खास करून मुंबई, पुणे या ठिकाणी चेकनेट बोरांना चांगलीच मागणी आहे आणि बाजारामध्ये दर देखील चांगला मिळतो म्हणून शेळके यांनी चेकनेटची लागवड केली.
advertisement
प्रेरणादायी! शारीरिक दिव्यांगत्वाला बनवली ताकद, दिव्यांग क्रिकेटपटू साजीद तांबोळीची टीम इंडियात निवड
सध्या लागवड केलेल्या चेकनेट बोरांची बाग फळावर असून येणाऱ्या पुढील महिन्यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे. चेक नेट बरोबर भुरी आणि कीड हा रोग पडू नये म्हणून त्यावर वेळोवेळी फवारणी करून घेतली त्यामुळे चेकनेट बोराच्या बागेवर कोणताही रोगाचा परिणाम झाला नाही. सध्या चेकनेट बोराला बाजारामध्ये 100 ते 120 रुपये किलो दराने भाव मिळत आहे.
advertisement
तसेच चेकनेट बोराच्या बागेत रेवणसिद्ध शेळके यांनी आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आणि चेकनेट बोराच्या बागेच्या लागवडीसाठी 30 हजार रुपये पर्यंतचा खर्च शेळके यांना आला आहे. तर फक्त कांदा विक्रीतूनच बोराच्या बागेचा आणि कांदा लागवडीचा खर्च निघणार आहे. तर पुढील महिन्यापासून चेकनेट बोराच्या तोडणीला सुरुवात होणार असून ही तोड संक्रांत पर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
सध्या बाजारामध्ये सुरू असलेल्या चेकनेट बोराच्या भावानुसार संक्रांत पर्यंत जवळपास 2 लाखाचा नफा पहिल्यांदाच चेकनेट बोराच्या विक्रीतून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले रेवणसिद्ध शेळके यांना मिळणार आहे. पुढील काही वर्षात तरुण शेतकऱ्यांना सुद्धा शेती शिवाय पर्याय नसून आतापासूनच उच्चशिक्षित तरुणांनी शेतीकडे लक्ष देऊन पिकाची योग्य माहिती घेऊन लागवड केल्यास नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न शेतीतून मिळेल असा सल्ला बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 26, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : बारावीपास शेतकऱ्यानं लावलं डोकं, एका एकरात घेतलं दुहेरी पिक, उत्पन्न मिळणार लाखात

