योजनांचा लाभ घेण्यासाठी पक्की पावती आवश्यक
विमा भरपाई, अनुदान किंवा कर्जमाफीसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतमालाची अधिकृत नोंद असणं आवश्यक आहे. जर तुम्ही शेतमाल अनधिकृत व्यापाऱ्यांना विकला, तर पुढे नुकसान झाल्यास तुम्हाला कोणतीही मदत मिळू शकणार नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, शेतमाल विक्रीच्या वेळी बाजार समितीच्या शिक्क्यासह गुलाबी पावती म्हणजेच पक्की पावती घ्यावी. हीच पावती तुमच्या व्यवहाराचा कायदेशीर पुरावा ठरते आणि भविष्यात अनुदान, विमा किंवा नुकसानभरपाईसाठी तीच उपयोगी पडते. शेतमाल फक्त नोंदणीकृत आणि अधिकृत व्यापाऱ्यांनाच विकावा, असंही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.
advertisement
फसवणूक झाल्यास लेखी तक्रार करण्याचे आवाहन
फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित बाजार समितीचे सचिव किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल करावी, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
पुण्याचे सभापती प्रकाश जगताप यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीचा व्यवहार करताना गुलाबी पक्की पावती घेणं हा त्यांच्या हक्काचं संरक्षण आहे. बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून, त्यांच्या हितासाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.






