सूक्ष्म अन्नद्रव
कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथे मायक्रो ग्रेड सेकंड सूक्ष्म अन्नद्रव्य गेल्या वर्षभरापासून तयार केले जाते. यामध्ये लोह (Fe), जस्त (Zn), मॅंगनीज (Mn), तांबे (Cu), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) घटकांचा समावेश केला आहे. भाजीपाला पिकांवरती पहिली फवारणी करताना प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 100 मिली मायक्रो ग्रेड सेकंड तसेच दुसरी फवारणी करताना 10 लिटर पाण्यामध्ये 150 मिली मायक्रो ग्रेड सेकंड वावरण्याची शिफारस कृषी संशोधक डॉ.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
advertisement
कोणत्या पिकास किती फवारण्या
ऊस पिकास 2 फवारणी
भाजीपाला पिकास 1 फवारणी
सोयाबीन, गहू आणि हरभरा पिकास 2 फवारणी
प्रमाण
पहिली फवारणी करताना प्रति दहा लिटर पाण्यामध्ये शंभर मिलीमायक्रो ग्रेड सेकंड
दुसरी फवारणी करताना दीडशे मिली औषध वापरावे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचे महत्व
पिकांची वाढ
सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
उत्पादकता
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या योग्य वापरामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढते.
रोगप्रतिकारशक्ती
काही सूक्ष्म अन्नद्रव्ये, जसे की बोरॉन आणि तांबे, पेशींच्या भिंतींना बळकट करून रोगांपासून संरक्षण करतात.





