हप्ता किती असावा?
तज्ञांच्या मते, शेतकऱ्याचा ट्रॅक्टरचा हप्ता (EMI) त्याच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या २० ते २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा.
उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याचे शेतीतून निव्वळ वार्षिक उत्पन्न ३ लाख (म्हणजेच महिन्याला २५,000) असेल, तर ट्रॅक्टरचा हप्ता ५,000 ते ६,000 रु पेक्षा जास्त ठेवू नये. यामुळे कर्जफेड करताना शेतीचे इतर खर्च. बियाणे, खते, कामगार, वीज आणि दुरुस्ती सहज पूर्ण करता येतात आणि आर्थिक ताण येत नाही.
advertisement
उदाहरण क्रमांक २
जर एखाद्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ६ लाख (मासिक ५०,000 रु) असेल, तर हप्ता मासिक उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. या उत्पन्नावर १२,५०० मासिक हप्त्यासह शेतकरी ७.५ लाख रुपयांचे ट्रॅक्टर कर्ज ५ वर्षांत सहज फेडू शकतो,तेही आर्थिक ताण न घेता.
कर्ज घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
डाउन पेमेंट द्या
ट्रॅक्टर खरेदी करताना किमान १५ ते २० टक्के डाउन पेमेंट रोख स्वरूपात द्यावे. उदाहरणार्थ, ९ लाख किंमतीच्या ट्रॅक्टरसाठी १.३५ लाख ते १.८० लाख इतके डाउन पेमेंट केल्यास हप्ता कमी होतो आणि व्याजाचा भारही घटतो.
सरकारी बँकांचा पर्याय निवडा
सरकारी बँका शेतकऱ्यांना ८% ते १०% व्याजदराने कर्ज देतात, तर खासगी वित्तसंस्था १२% ते १५% पर्यंत व्याज आकारतात. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे अधिक फायदेशीर ठरते.
कर्ज मुदत मर्यादित ठेवा
कर्जाची मुदत ५ वर्षांपेक्षा जास्त ठेवू नका. मुदत वाढल्यास व्याजाचा भार वाढतो आणि एकूण रक्कम मोठी होते.
विमा आणि देखभाल विसरू नका
ट्रॅक्टरसाठी दरवर्षी किमान १०,००० रु ते १५,००० रु रक्कम विमा आणि देखभालीसाठी राखून ठेवा. त्यामुळे आकस्मिक दुरुस्ती किंवा अपघात झाल्यास आर्थिक अडचण येणार नाही.
शेतकऱ्यांसाठी सुवर्ण नियम
EMI = मासिक उत्पन्नाचा २५% पेक्षा जास्त नाही.
डाउन पेमेंट = ट्रॅक्टर किंमतीचा १५-२०%.
व्याजदर = ८-१०% (सरकारी बँक).
मुदत = ५ वर्षांपर्यंत.
थोडक्यात सांगायचे झाले, तर ट्रॅक्टर कर्ज घेण्याआधी आपल्या उत्पन्न, खर्च आणि परतफेडीची क्षमता यांचा नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. हप्त्याचे योग्य नियोजन केले, तर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसह शेतीचा विस्तार करणे अधिक सोपे आणि सुरक्षित ठरेल.