Diwali Shopping : दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत फक्त 300 रुपये, मुंबईतील या प्रसिद्ध मार्केटमध्ये करा खरेदी

Last Updated:

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीला जोरदार सुरुवात झाली आहे. येथे पुरुषांसाठी विविध प्रकारचे कुर्ते अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

+
News18

News18

मुंबई: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीला जोरदार सुरुवात झाली आहे. भुलेश्वर मार्केटमधील जय आंबे चौकात वसलेले नितेश स्टोअर हे अशाच एका ठिकाणी ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. येथे पुरुषांसाठी विविध प्रकारचे कुर्ते अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
या दुकानात 300 पासून सुरू होणारे कुर्ते ग्राहकांना खूपच आवडत आहेत. खासकरून कॉटन कुर्ते जे 300 मध्ये उपलब्ध आहेत, त्यामध्ये 10 ते 15 रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे ट्रेडिशनल आणि कॅज्युअल लुकसाठी हे कुर्ते उपयुक्त ठरत आहेत.
advertisement
दुकानात नुकतीच आलेली प्रिंटेड कुर्त्यांची नवीन रेंजही चर्चेचा विषय ठरत आहे. हे कुर्ते 800 मध्ये मिळत असून त्यामध्ये 10 ते 12 आकर्षक प्रिंट्स पाहायला मिळतात. हे कुर्ते सणासुदीच्या किंवा हलक्याफुलक्या पार्टीसाठी अगदी योग्य ठरतात. तसेच अधिक क्लासी आणि प्रीमियम पर्याय शोधणाऱ्यांसाठी क्रिस्टल पिंक प्रीमियम कुर्ते उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 1200 आहे. हे कुर्ते फेस्टिव्ह आणि खास प्रसंगांसाठी योग्य आहेत.
advertisement
चिकनकारी प्रकारातील कुर्त्यांची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येथे 700 मध्ये चिकनकारी कुर्ते उपलब्ध असून त्यामध्येही 10 ते 15 रंगांचे पर्याय आहेत. या कुर्त्यांना ट्रेडिशनल लुक असून ते आरामदायक देखील आहेत. लहान मुलांसाठी कुर्ता-पायजमा सेट 400 पासून उपलब्ध असून हे सेट होलसेल आणि रिटेल दरात दिले जात आहेत. दुकानात ग्राहकांना डिस्काउंट देखील मिळत असून सणासुदीच्या खरेदीला गती मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत फक्त 300 रुपये, मुंबईतील या प्रसिद्ध मार्केटमध्ये करा खरेदी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement