अस्सल आगरी पद्धतीचा झणझणीत कोळंबी रस्सा, इतका सोपा की चव विसरणार नाही
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल अस्सल झणझणीत आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’ कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. यामुळे चला जाणून घेऊया कसा बनवायचा आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’...
नॉनव्हेज पदार्थ अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. चिकन, मटन, मच्छी आणि खेकडे असे वेगवेगळ पदार्थ नॉनव्हेज लव्हर मोठ्या चवीने खात असतात. मासे म्हटलं की, कायमच आपल्या तोंडाला पाणी सुटतंच. अनेक चिकन लव्हर लोकं, काटे असणार्या मच्छीच्या ऐवजी काटे नसणाऱ्या मच्छीला अधिकच प्राधान्य देतात. विशेषत: बऱ्याच लोकांना कोळंबी हा मच्छीचा प्रकार अधिक आवडतो. यामुळे कोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जाते.
अनेकांना त्या मच्छीचे कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे पदार्थ फार आवडतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल अस्सल झणझणीत आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’ कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. यामुळे चला जाणून घेऊया कसा बनवायचा आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’...
आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’ बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज लागते. ‘कोळंबी रस्सा’ बनवण्यासाठी १.पाव कोळंबी, आले लसूण पेस्ट, वांगी नसतील तर शेवग्याची शेंग ही घेऊ शकता, टोमॅटो, हळद, सुक्के वाटण(लसून, भाजलेला खोबरा, कोथिंबीर, वेलची आणि जीरा एकत्र करून केलेले वाटण) मसाला, तेल आणि चवीनुसार मीठ अशा साहित्याची गरज आहे.
advertisement
कृती. - प्रथम कडईत २ टिस्पून तेल गरम करून घेणे, नंतर आले लसूण पेस्ट (पेस्ट कोळंबीला जाडसर ठेवावी )जेणेकरून कोळंबी मधला गोडसर पणा निघून जाईल,मसाला ३ चमचे ,हळद एक चमचा , टॉमेटो, वाटण,सर्व टाकल्यावर एकत्र करून घेणे आणि गॅसच्या बंद आचेवर शिजवून घेणे,वाफ यायला लागली की त्यात कोळंबी वागा टाकून परत झाकण देऊन वाफेवर कोळंबी ५मिनिटे शिजवुन घेणे, थोड्यावेळात कोळंबी त गरम पाणी टाकणे, पुन्हा १०मिनिटे गॅस फास्ट करून शिजवणे, १०मिनटात हॉटेल सारखी मसालेदार कोळंबी रस्सा रेडी...हा रस्सा तुम्ही भात ,भाकरी ,चपाती सोबत खाऊ शकता.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 14, 2025 4:07 PM IST