एनओसी म्हणजे काय?
एनओसी म्हणजे "No Objection Certificate" म्हणजेच वाहनाशी संबंधित कोणतीही थकबाकी, दंड, कर्ज किंवा कायदेशीर वाद नसल्याचे प्रमाणपत्र. ट्रॅक्टर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात हस्तांतरित करताना मूळ नोंदणी प्राधिकरणाकडून (RTO) एनओसी घेणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे मिळाल्यावरच नवीन ठिकाणी नोंदणी किंवा ट्रॅक्टरचे नावांतर करता येते.
एनओसीसाठी आवश्यक कागदपत्रे
ट्रॅक्टरसाठी एनओसी मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की,वाहनाचा नोंदणी प्रमाणपत्र (RC Book)
advertisement
विमा पॉलिसी (Insurance Certificate)
वाहनधारकाचा ओळख पुरावा – आधारकार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
पत्ता पुरावा – रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल किंवा बँक पासबुक
पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (NCRB report) – वाहन चोरी किंवा गुन्ह्यात गुंतलेले नाही याची खात्री फायनान्स कंपनीकडून NOC – जर ट्रॅक्टर कर्जावर घेतले असेल तर बँक किंवा वित्तसंस्थेची संमतीपत्र आवश्यक तसेच Form 28 – RTO कडून दिले जाणारे एनओसीसाठी अधिकृत अर्जपत्र
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी कराल?
ट्रॅक्टरसाठी एनओसी मिळवण्यासाठी शेतकरी वाहन सेवा पोर्टल (https://parivahan.gov.in) वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्वप्रथम पोर्टलवर लॉगिन करा आणि “Online Services → Vehicle Related Services” या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या जिल्ह्याचा RTO निवडा आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.“Application for Issue of NOC” हा पर्याय निवडा. मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.आवश्यक ती फी ऑनलाइन भरा (साधारणतः 100 रु ते 200 रु). अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला Acknowledgement Slip आणि Application Number मिळेल. काही दिवसांत RTO कार्यालयाकडून तपासणी पूर्ण होऊन एनओसी डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
ऑफलाइन प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांकडे इंटरनेट सुविधा नाही त्यांनी जवळच्या RTO कार्यालयात जाऊन Form 28 भरून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करून फी भरावी. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यावर एनओसी प्रदान केली जाते. ही प्रक्रिया साधारणतः ७ ते १५ दिवसांत पूर्ण होते.
एनओसीची वैधता किती दिवसांची असते?
एनओसी एकदा मिळाल्यानंतर ती ६ महिन्यांसाठी वैध असते. या कालावधीतच ट्रॅक्टरचे नावांतर किंवा पुनर्नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर ठराविक वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर नवीन एनओसीसाठी पुन्हा अर्ज करावा लागतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
अर्ज करण्यापूर्वी वाहनावरील सर्व दंड आणि कर भरलेले असल्याची खात्री करा.
वाहन कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सामील नाही याची पोलीस पडताळणी आवश्यक आहे. एनओसी मिळाल्यानंतर मूळ दस्तऐवज जपून ठेवा, कारण ते नावांतराच्या वेळी आवश्यक असतात.
