उडीद आणि मूगवर बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग पडलेले पाहायला मिळतात. येलोमोजियाड, तांबेरा रोग, करपा रोग उडीद आणि मूगवर हे रोग प्रामुख्याने येतात. उडीदवर जर केसाळ अळी हा रोग आला असेल तर क्विनॉलफॉस 25 इसी 1 हजार मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच एखाद्या झाडावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास ताबडतोब ती रोप तोडून त्यावरील केसाळ अळी नष्ट करून टाकावी. त्याचबरोबर या पिकावर भुरी, पिवळा विषाणू यांचा देखील प्रादुर्भाव असतो. जर उडीद किंवा मूग वर भुरी रोग पडल्यास पानावर सुरुवातीलाच लहान, अनियमित, पांढरे चट्टे दिसतात. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति 10 लिटर पाण्यात कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम टाकून फवारणी करावी.
advertisement
Pik Vima 2025: पीक विमा भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास, लगेच करा अर्ज, हे निकष माहिती हवेच!
तसेच उडीद आणि मूग या पिकांवरील पांढऱ्या माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एकरी 15 पिवळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोगग्रस्त झाडे दिसून येत असतील तर त्याला नष्ट करणे गरजेचे आहे. तसेच उडीद पिकावर शेंगा पोखरणारी अळी दिसून आल्यास फ्लूबेंडायअमाइड 39.35 टक्के प्रवाही 2 मिली यांची 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी. मूग आणि उडीद पिकावर पाने आकसाने हा विषाणूजन्य रोग असून तुडतुडा या किड्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
या रोगामुळे कवळी पाने आकसतात आणि झाडाची वाढ थांबते आणि उत्पन्नात सुद्धा घट होते. हा रोग जर थांबवायचा असेल तर यासाठी फ्लूबेंडायअमाइड 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिसळून फवारणी करायची आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी उडीद आणि मूग पिकावर पडणाऱ्या रोगाची काळजी घेतली तर नक्कीच शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पंकज मडावी यांनी दिली.