महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कडधान्यातील तूर हे महत्त्वाचे पीक आहे. तुरीच्या पिकावर जवळपास 200 पेक्षा अधिक किडी आढळतात, तर तुरीच्या पिकावर 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळे रोग आढळतात. तुरीच्या पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारे अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी अशा वेगवेगळ्या प्रकारचे अळी या तुरीच्या पिकावर आढळतात. तुरीच्या पिकावर शेंगा लागायला सुरुवात झाली की त्यावर शेंगा पोखरणारे अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. शेंगा पोखरणारी अळी ही अत्यंत बहुभक्षी अळी मानली जाते. ही अळी तूर पिकावर आपली उपजीविका न करता वेगवेगळ्या पिकांवर सुद्धा आपली उपजीविका करत असते.
advertisement
मुलं सांभाळत नाहीत, 75 वर्षांच्या आजोबांची तक्रार, प्रांताधिकाऱ्यांनी अशी घडवली अद्दल, Video
शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन
तुरीचे पीक फ्लोरा अवस्थेत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळी अंडी देतात. अंड्यातून अळी बाहेर येतात तेव्हा कोवळ्या पानांवर, फुलांवर, अंडी घालत असतात. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करायचा असेल तर एकरी चार ते पाच कामगंध सापळे लावणे, इंग्रजीत टी आकाराचे 30 ते 50 पक्षी थांबे लावणे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काची फवारणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करावी. अशा पद्धतीने शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून तुरीच्या पिकाचे संरक्षण केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी दिला.





