TRENDING:

घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

Last Updated:

Agriculture News : शेतजमिनीच्या हद्दी तपासायच्या असतील, नवीन रस्ता काढायचा असेल, किंवा जमीन संबंधित कोणतीही माहिती हवी असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे त्या जमिनीचा अधिकृत नकाशा असणे आवश्यक असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शेतजमिनीच्या हद्दी तपासायच्या असतील, नवीन रस्ता काढायचा असेल, किंवा जमीन संबंधित कोणतीही माहिती हवी असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे त्या जमिनीचा अधिकृत नकाशा असणे आवश्यक असते. यापूर्वी हा नकाशा मिळवण्यासाठी तलाठी किंवा महसूल कार्यालयाचे धारे धरावे लागत होते. मात्र, आता ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. महाराष्ट्र शासनाने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबतच जमिनीचा डिजिटल नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

डिजिटल नकाशा कसा पाहायचा?

शेतकरी किंवा नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जावे लागते.

वेबसाईट उघडल्यानंतर ‘Location’ या विभागात राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. तुमचा भाग ग्रामीण असेल, तर ‘Rural’, शहरी असेल तर ‘Urban’ निवडा.

नंतर ‘Village Map’ वर क्लिक करा. संबंधित गावाचा नकाशा तुमच्या स्क्रीनवर येईल. झूम इन/आऊट करून तो नकाशा सहज पाहता येईल. फुल स्क्रीन मोड सुद्धा उपलब्ध आहे.

advertisement

प्लॉट नकाशा (गट नकाशा) कसा काढायचा?

वेबसाईटवर ‘Search by Plot Number’ हा पर्याय निवडा. तुमच्या सातबारा उताऱ्यावर असलेला गट क्रमांक टाका.यानंतर त्या गटाचा नकाशा स्क्रीनवर दिसेल.

डाव्या बाजूला ‘Plot Info’ मध्ये त्या गटातील शेतकऱ्यांची नावे, त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचा क्षेत्रफळ याची सविस्तर माहिती मिळते. त्याच भागात शेजारील गट क्रमांक कोणते आहेत हे देखील पाहता येते.

advertisement

नकाशा डाऊनलोड कसा करायचा?

नकाशा पाहिल्यानंतर डावीकडे असलेल्या ‘Map Report’ पर्यायावर क्लिक करा. नंतर उजव्या कोपऱ्यातील डाऊनलोड चिन्हावर (↓) क्लिक करून नकाशा PDF स्वरूपात डाऊनलोड करता येतो.

ई-नकाशा प्रकल्प म्हणजे काय?

भूमि अभिलेख विभाग 1880 पासूनचे जुने नकाशे सांभाळत आले आहेत. मात्र, हे नकाशे फारच नाजूक अवस्थेत असल्यामुळे त्यांचे डिजिटायजेशन करणे आवश्यक झाले होते. त्यामुळेच राज्य शासनाने ‘ई-नकाशा’ प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत, तालुका स्तरावरील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे आदींचे डिजिटायजेशन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आता सातबारा उताऱ्याप्रमाणेच डिजिटल नकाशेही घरबसल्या पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहेत.

advertisement

नवीन पिढीच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

ई-नकाशा प्रकल्पामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. नवीन पिढीच्या डिजिटल शेतकऱ्यांसाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरणार आहे. जमिनीचा अधिकार सिद्ध करणे, शेतीसाठी कर्ज घेणे, फेंसिंग करणे यासाठी हा ऑनलाईन नकाशा अतिशय उपयुक्त आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि तुरीच्या दरात पुन्हा घट, कापसाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या ई-नकाशा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासोबतच जमिनीचा अधिकृत नकाशा ऑनलाईन पाहता व डाऊनलोड करता येणार आहे. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण डिजिटल पाऊल आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल