TRENDING:

सोयाबीन आणि तुरीच्या दरात पुन्हा घट, कापसाला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घट झाली असून, कांद्याच्या दरात मात्र वाढ दिसून येत आहे. तसेच आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 15 जानेवारी गुरुवार रोजी राज्यातील कृषी बाजारात काही प्रमुख पिकांच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असली तरी काही पिकांमध्ये दर सुधारल्याचे चित्र आहे. कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घट झाली असून, कांद्याच्या दरात मात्र वाढ दिसून येत आहे. तसेच आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? पाहुयात.
advertisement

कपाशीच्या दरात पुन्हा नरमाई

कृषी मार्केटच्या वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 10 हजार 700 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये नागपूर बाजारात सर्वाधिक 3 हजार 300 क्विंटल कपाशीची आवक झाली. नागपूर येथे कपाशीला किमान 7 हजार 800 तर कमाल 7 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दरम्यान, वर्धा बाजारात आलेल्या लांब स्टेपल कपाशीला 8 हजार 290 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा उच्चांकी दर मिळाला. मात्र, बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज कपाशीच्या बाजारभावात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

कांद्याच्या बाजारभावात वाढ

आज राज्यातील कृषी बाजारांत एकूण 22 हजार 959 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी अहिल्यानगर बाजारात 14 हजार 483 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 333 ते कमाल 1 हजार 814 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सातारा बाजारात आवक झालेल्या कांद्याला 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. बुधवारी मिळालेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे बाजारातील चित्र आहे.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पुढील 24 तास महत्त्वाचे!, हवामान खात्याकडून अलर्ट

सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण 20 हजार 591 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये वाशिम बाजारात 5 हजार क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. वाशिम बाजारात सोयाबीनला किमान 4 हजार 625 ते कमाल 5 हजार 175 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पिवळ्या सोयाबीनला वाशिम बाजारातच 5 हजार 805 रुपये प्रतिक्विंटल असा उच्च दर मिळाला. मात्र, बुधवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात घट नोंदवण्यात आली आहे.

advertisement

तुरीच्या दरात घसरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 5 हजार 599 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये वाशिम बाजारात 1 हजार 303 क्विंटल लाल तुरीची सर्वाधिक आवक झाली. त्या ठिकाणी तुरीला किमान 6 हजार 622 ते कमाल 7 हजार 397 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम बाजारात आलेल्या काही तुरीला 7 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा उच्चांकी दर मिळाला असला तरी, बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन आणि तुरीच्या दरात पुन्हा घट, कापसाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल