सिब्बल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत रोलिन्स यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आणि जगातील अग्रगण्य कृषी उत्पादक देशांची यादी प्रसिद्ध केली. त्यांनी म्हटले की, “अमेरिका नक्कीच एक मोठा कृषी उत्पादक देश आहे, पण ती जगाला अन्न पुरवते असा दावा हास्यास्पद आहे.”
सिब्बल यांचे प्रत्युत्तर
सिब्बल यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत चीन, अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया, फ्रान्स, मेक्सिको, जपान, जर्मनी आणि तुर्की यांचा समावेश आहे. त्यांनी स्पष्ट केलं की चीन सध्या जगातील सर्वात मोठा कृषी उत्पादक देश आहे. सिब्बल म्हणाले, “कोणत्या मूर्खाने अमेरिकन कृषी सचिवांना अशी माहिती दिली की अमेरिका जगाला अन्न पुरवते?” असंही ते म्हणाले
advertisement
जगातील सर्वात मोठे कृषी निर्यातदार देश युरोपियन युनियन, अमेरिका, ब्राझील, चीन, कॅनडा, थायलंड, भारत, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया आहेत. चुकीच्या माहितीद्वारे निर्माण होणारा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.असं सिब्बल यांनी नमूद केले.
वादाची सुरुवात कशी झाली?
वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा रोलिन्स यांनी अमेरिकन सोयाबीन शेतकऱ्यांबद्दल भाष्य करताना चीनवर टीका केली. त्यांनी म्हटले की चीनने व्यापार चर्चेदरम्यान अमेरिकन सोयाबीन खरेदीला दबावाचे शस्त्र बनवले आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन खरेदीदार देश आहे आणि अमेरिकन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.
अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांनंतर चीनने सोयाबीनवर २३% आयात कर लावला होता. यामुळे चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी कमी करून दक्षिण अमेरिकन देशांकडून आयात वाढवली. तथापि, अलीकडच्या चर्चांमध्ये बीजिंगने जानेवारीपर्यंत १२ दशलक्ष टन अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे.
🇺🇸 रोलिन्स आणि ट्रम्प यांची भूमिका
ब्रुक रोलिन्स यांनी ठामपणे सांगितले की, “चीनला अमेरिकन शेतकऱ्यांचा प्यादे म्हणून वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आमचे शेतकरी जगाचे पोषण करतात आणि त्यांना ट्रम्पसारखा नेता आवश्यक आहे, जो त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढेल.” असंही त्यांनी म्हंटले आहे.
