जालना : सीताफळ म्हटलं की 200 ते 400 ग्राम पर्यंतचे फळ आपण आतापर्यंत पाहिल असेल. मात्र तब्बल 1100 ते 1200 ग्रॅम वजनापर्यंत सीताफळ जालन्यातील एका शेतकऱ्याने पिकवलं आहे. सरस्वती सेवन नावाच्या वाणाला ही सीताफळ आली असून बागेतील 25 टक्के फळे ही एक किलोच्या आसपास आहेत. जालन्यातील रामप्रसाद खैरे या प्रगतशील शेतकऱ्याने ही सीताफळे पिकवली आहेत.
advertisement
तब्बल 1100 ग्रॅमपर्यंत वजनाची फळे
जालना जिल्ह्यातील वखारी या गावचे रहिवासी रामप्रसाद खैरे यांच्याकडे एकूण 17 एकर शेत जमीन आहे. या संपूर्ण शेत जमिनीवर त्यांनी सीताफळ या फळझाडांची लागवड केली आहे. त्यांच्याकडे बालानगर सुपर गोल्डन आणि सरस्वती सेवन या वाणांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सरस्वती सेवन या वाणाच्या झाडांना तब्बल 1100 ग्रॅमपर्यंत वजनाची फळे लगडली आहेत.
पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड, आवाजाने वन्यप्राणी आणि पक्षी थांबणारच नाहीत
काय आहेत वाणाची वैशिष्ट्य?
या वाणाच वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची फळे ही सहा महिने हार्वेस्टिंग करता येतात. म्हणजेच हार्वेस्टिंगचा कालावधी हा अधिक आहे. त्याचबरोबर फळांची साईज ही इतर सीताफळांच्या तुलनेत खूप मोठी आहे. ही सीताफळे अत्यंत गरेबाज चवीला अत्यंत गोड आणि लहान बिया असणारी असतात. या सीताफळांची साल ही अतिशय पातळ असते. हार्वेस्टिंगचा कालावधी जास्त असल्याने तसेच वजन आणि गरेबाज असल्याने याची आंतर मशागत अधिक घ्यावी लागते. त्याचबरोबर फळांची तोडणी करतानाही पद्धतशीर करावी लागते, असं शेतकरी रामप्रसाद खैरे यांनी सांगितलं.
राजकारण नको रे बाबा... 25 वर्षे राजकारणात झोकून दिलेल्या कार्यकर्त्याची कहाणी
खैरे यांनी आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज असाव्यात म्हणून सरस्वती सेवन या वाणाची म्हणून वर्धा येथून 70 रुपये प्रति झाड याप्रमाणे 500 झाडांची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे. सरस्वती सेवन या वाणाच्या एका झाडापासून 1000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. एका एकरामध्ये 400 रुपये लागवड करू शकतो. नियोजन केलं तर शेतकरी 4 लाखांपर्यंत उत्पन्न सरस्वतीचे वन या वाणाची लागवड करून घेऊ शकतात, असं खैरे यांनी सांगितलं.





