TRENDING:

Success Story: गावरान मेंढी पालन ठरलं भारी, वर्षाला 15 लाख निव्वळ कमाई, कशी आहे पद्धत?

Last Updated:

कारभारी शेळके हे मेंढी पालन व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत. यामधून वर्षाला लाखोंची कमाई करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात कारभारी शेळके हे मेंढी पालन व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत. मेंढी पालनाचा व्यवसाय वडिलोपार्जित असून शेळके यांच्याकडे 200 गावरान मेंढ्या असून त्या बारा महिन्यातून 2 वेळा पिल्लांना जन्म देतात. तसेच ते मेंढ्यांची विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत तर वर्षाला 10 ते 15 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळवतात.
advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या मेंढी पालकांचा प्रवास संपूर्ण 4 महिन्यांसाठी असतो तसेच ते राहतात. ज्या ठिकाणी मेंढ्यांच्या चाऱ्याची, खाद्याची आणि पाण्याची सोय होते अशा ठिकाणी 4 ते 5 दिवसांचा मुक्काम ते करत असतात. कारभारी शेळके हे मूळ जालन्यातील भोकरदन तालुक्यात राहतात. 8 महिने गावाकडे तर पावसाळ्यात चार महिने छत्रपती संभाजीनगर येथे मेंढी पालन करत असल्याचे शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

Success Story: शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 2 लाखांची सहज कमाई

मेंढ्या चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी चाऱ्याची, पाण्याची, औषधांचे वेळेनुसार योग्य नियोजन करावे लागते. चाऱ्यामध्ये वाळलेला घास हा मेंढ्यांच्या पोषकतेसाठी उपयुक्त ठरतो.

तसेच तरुण किंवा शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे यायला हवे कारण याच्यामध्ये उत्पन्न चांगले आहे. यासाठी मेहनत देखील जास्त प्रमाणात असून ज्यांची रात्रंदिवस काम करायची तयारी आहे अशा नागरिकांनी मेंढीपालन करावे, असा सल्ला मेंढी पालन व्यवसायात येणाऱ्या नव्या व्यावसायिकांना शेळके यांनी दिला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story: गावरान मेंढी पालन ठरलं भारी, वर्षाला 15 लाख निव्वळ कमाई, कशी आहे पद्धत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल