पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासन राबवित असते. शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2027-28 या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
50 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या 1 दुधाळ गाय/म्हशीचे वाटप. 75 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या 1 भ्रूणाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप. 25 टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा. 25 टक्के अनुदानावर फट आणि एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा. 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप. 25 टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा. 100 टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे.
advertisement
तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरिता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा 2 चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना 9605451850 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






