सोलापूर : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता एकूण दरवर्षी 12 हजार रुपये मिळत आहेत.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 84 हजार 550 शेतकऱ्यांच्या खात्यावर 96.91 कोटी रुपयांचा अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
DJ च्या दणदणाटामुळे होतायेत गंभीर परिणाम, तुमच्याही आरोग्याला धोका? तज्ज्ञांनी काय सांगितलं, VIDEO
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षातून दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांचे तीन हप्ते मिळत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्यामुळे केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकरी नमो सन्मान योजना गेल्या वर्षापासून सुरू केली आहे. पीएम किसान योजनेचे सर्व लाभार्थी शेतकरी नमो सन्मान योजनेसाठी पात्र केले आहेत.
गणपती बाप्पाने नेसली साडी, विनायकाच्या या अवतारामागील नेमकी कथा काय, VIDEO
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 84 हजार 550 शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांनी महासेवा केंद्र किंवा आपले सेवाकेंद्र या ठिकाणी जाऊन या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने केले आहे.