DJ च्या दणदणाटामुळे होतायेत गंभीर परिणाम, तुमच्याही आरोग्याला धोका? तज्ज्ञांनी काय सांगितलं, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
मिरवणुकीत सामील झालेल्या व्यक्तीबरोबरच मिरवणूक बघायला येणाऱ्याचाही सवेश आहे. यातील काही जणांना तात्पुरत्या स्वरूपात हा त्रास जाणवत असून, काहींना तर ही समस्या आयुष्यभरासाठी उद्भवली आहे. या संदर्भात डीजे - डॉल्बी मूळ आपल्या कानांवर नेमका काय प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने कोल्हापुरातील प्रसिध्द कान,नाक, घसा तज्ञ डॉ. जयंत वाटवे यांच्याशी संवाद साधला.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि ढोल ताशांचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये कोल्हापूरसह राज्यातही आवाजाची कमाल मर्यादा गाठली असून, जवळपास सगळीकड ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या मोठ्या आवाजाचा कानावर जोरदार मारा झाल्याने आत्तापर्यंत कित्येकांना ऐकू न येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
यात मिरवणुकीत सामील झालेल्या व्यक्तीबरोबरच मिरवणूक बघायला येणाऱ्याचाही सवेश आहे. यातील काही जणांना तात्पुरत्या स्वरूपात हा त्रास जाणवत असून, काहींना तर ही समस्या आयुष्यभरासाठी उद्भवली आहे. या संदर्भात डीजे - डॉल्बी मूळ आपल्या कानांवर नेमका काय प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने कोल्हापुरातील प्रसिध्द कान,नाक, घसा तज्ञ डॉ. जयंत वाटवे यांच्याशी संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना डॉ. जयंत वाटवे यांनी सांगितलं की, आपण दररोज ऐकण्याचा आणि बोलण्याचा तेव्हा आवाज हा 40 ते 50 डेसिबलपर्यंत असू शकतो. आपण 70 डेसिबल या मर्यादेपर्यंत आवाज कान सहन करू शकतो. त्याचप्रमाणे या आवाजाची तीव्रता जर 80 ते 100 डेसिबलपर्यंत गेली आणि तो आवाज सतत कानावर पडत राहिला तर ऐकण्याची क्षमता कमी होते. याउलट डीजेचा आवाज 90 ते 100 डेसिबल असतो. 100 ते 120 डेसिबलदरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटण्याची किंवा, चक्कर येण्याची शक्यता असते, असेही ते म्हणाले.
advertisement
मोठ्या आवाजाचा असाही परिणाम -
advertisement
हृदयावर ताण येणे, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखा जीवघेणा त्रास, यासोबतच रक्तदाब आणि हृदयाची धडधड वाढल्याने हार्मोनच्या पातळीत बदल झाल्याचा परिणाम अधिक घातकच ठरतो. तो फक्त शरीर म्हणूनच नाही, तर मानसिकतेवरीही होऊ शकतो. चिडचिड वाढण्याचा झोपेवरही परिणाम होतो, असे अनेक परिणाम मोठ्या आवाजामुळे होऊ शकतात.
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम, काय आहेत लक्षणे?
सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरे होण्याची शक्यता असते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जितका जास्त काळ हा आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. अनेकदा कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाशा गुणगुणल्यासारखे आवाज येतात.
advertisement
आवाज किती असावा? शासनाचे नियम काय आहेत?
- ध्वनिप्रदूषण (कायदा आणि नियंत्रण) नुसार, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा आवाज 10 डेसिबलपेक्षा जास्त असू नये. तसेच खासगी ठिकाणी ध्वनिक्षेपकाची मर्यादा अनुक्रमे 5 डेसिबलपेक्षा जास्त नसावी.
advertisement
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 14, 2024 1:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
DJ च्या दणदणाटामुळे होतायेत गंभीर परिणाम, तुमच्याही आरोग्याला धोका? तज्ज्ञांनी काय सांगितलं, VIDEO