बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात मद्यपींचा त्रास वाढला आहे. कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोंरं जावं लागू नये म्हणून रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. याबाबत बाजार समिती आवारात तसे फलकही लावण्यात आले आहेत.
advertisement
सुरक्षेत वाढ
नाशिक बाजार समितीत वाढत्या चोऱ्या आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. रात्रीचे शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार थांबवण्यासाठी रात्री 11 ते 4 या वेळेत बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेची देखील अधिक खबरदारी घेतली जाणार आहे.
दरम्यान, तब्बल 5 दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव बाजारसमितीत आजपासून कांदा लिलाव सुरू झाला आहे. मात्र कांदा दरात घसरण झाली असून यामुळे आज कांद्याला कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1602 तर सरासरी 1250 रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.