थोरात यांच्याकडे एकूण पाच एकर शेती असून सुरुवातीला ते संपूर्ण जमिनीत पारंपरिक शेती करत होते. मात्र खर्च वाढत असताना नफा मात्र कमी होत होता. याच काळात त्यांनी यूट्यूबवर अव्होकॅडो फळाबद्दल माहिती पाहिली. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारे आणि बाजारात उच्च किंमत असलेले हे फळ त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या पिकाचा सखोल अभ्यास केला.
advertisement
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांच्या महत्त्वाचा सल्ला
अभ्यासानंतर थोरात यांनी एक एकर क्षेत्रात अव्होकॅडोची प्रायोगिक लागवड केली. सुरुवातीची काही झाडे चांगली वाढू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. काही वर्षांनी झाडांना फळधारणा सुरू झाली आणि अव्होकॅडोचे उत्पादन बाजारात विक्रीस जाऊ लागले. यामुळे थोरात यांनी या पिकाचे क्षेत्र कायम ठेवण्याचा आणि अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला.
आज अवघ्या एका एकर अव्होकॅडो शेतीतून परमेश्वर थोरात यांना दरवर्षी 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कमी पाण्यात एवढा मोठा नफा मिळाल्याने हे पीक त्यांच्या डोंगराळ भागातील शेतीसाठी वरदानच ठरले आहे. उर्वरित चार एकरमध्ये त्यांनी पारंपरिक शेती कायम ठेवत उत्पन्नाचे विविध स्त्रोतही सक्षम केले आहेत.
थोरात यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्येही नवीन पिकांचा स्वीकार, आधुनिक माहितीचा वापर आणि बाजारपेठेतील मागणी ओळखल्यास शेतीत आर्थिक स्थैर्य साधता येते, याचे उत्तम उदाहरण अव्होकॅडो शेतीने दिले आहे.





