पूरामुळे उध्वस्त झाले जीवन
मधुकर पाटील हे साधारण शेतकरी असून त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील संपूर्ण भात आणि भाजीपाला पिके वाहून गेली. घराच्या परिसरात पाणी साचल्यामुळे पिकाबरोबरच जनावरांसाठीच्या चाऱ्याचेही नुकसान झाले. पाटील यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगी आणि ११वीत शिकणारा मुलगा आहे. त्यामुळे उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता त्यांना सतावत आहे.
advertisement
केंद्र सरकारवर टीका
पाटील यांनी सरकारच्या योजनांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “प्रधानमंत्री पीक विमा योजना नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे. या योजनेतून थोडाफार दिलासा मिळेल, अशी आशा होती. पण माझ्या खात्यात फक्त २ रुपये ३० पैसे जमा झाले. एवढ्या मोठ्या आपत्तीनंतर ही मदत म्हणजे थट्टा आहे.
शेतकऱ्यांचा वाढता रोष
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अशीच परिस्थिती भोगावी लागत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. काहींना केवळ काही रुपये ते काही दशांश पैशांचे विमा हप्ते जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
