सोलापूर : स्ट्रॉबेरी म्हटलं की, महाबळेश्वरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवेचे ठिकाणी असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. पण चक्क सोलापुरातील पंढरपुरात एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. 10 गुंठे शेतात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरूण शेतकऱ्यानं 4 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. पंढरपूर तालुक्यातील चळे गावात राहणाऱ्या सागर शिंदे यांनी ही स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.
advertisement
चळे येथील शेतकरी तरुण सागर शिंदे याने पारंपारिक शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. सागर शिंदे या कॉलेज शिकणाऱ्या तरुणाने पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करायचं निर्णय घेतला. 10 गुंठ्यात 5 हजार स्ट्रॉबेरीच्या रोपाची लागवड केली आहे. तसेच सागर यांनी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला आहे. याच्या या अभिनव प्रयोगाची तालुक्यातच नाही तर सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे. स्ट्रॉबेरीला ग्रामीण तसेच शहरी भागात चांगली मागणी होत आहे. स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून तरुण शेतकरी सागर शिंदे यांनी 4 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
पपई शेती ठरली वरदान! सव्वा एकरमध्ये घेतलं 8 लाखांचं उत्पन्न, तरुण शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
स्ट्रॉबेरीच्या विक्रीसाठी सागर हा सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी सागर शिंदे यांना ऑर्डर येत आहे. पंढरपुरात पिकवलेली सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा या जिल्ह्यातून ग्राहकांनी स्ट्रॉबेरीची ऑर्डर केली होती. गेल्या वर्षी सुद्धा सागर शिंदे यांनी 2 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. मागील वर्षी स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी झाल्यानंतर यावर्षी सुद्धा सागर यांनी 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
नोकरीच्या मागे न पडता किंवा मोबाईलच्या आहारी न जाता पारंपारिक पिकांपेक्षा शेतीमध्ये नवीन पिके कसे घेता येईल, कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल. याकडे लक्ष देऊन आपण जर शेती केल्यास नक्कीच नोकरीपेक्षा जास्त कमाई आपण या शेतीच्या माध्यमातून करू शकाल, असा सल्ला तरुण शेतकऱ्यांना सागर शिंदे यांनी दिला आहे.