गुळाला सर्वाधिक भाव: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2081 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 1221 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4410 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई बाजारात आवक झालेल्या 80 क्विंटल गुळास 12500 ते 17000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर टिकून: गेल्या महिनाभरापासून बाजारात शेवग्याची आवक अतिशय कमी होत आहे. अशातच मागणी अधिक असल्याने शेवग्याचे दर टिकून आहेत. राज्याच्या मार्केटमध्ये आज 22 क्विंटल शेवग्याची एकूण आवक झाली. यापैकी 14 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात राहिली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 16500 ते 25000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंब तेजीत: आज राज्याच्या मार्केटमध्ये 703 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 180 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12000 ते 15000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 33 क्विंटल भगवा डाळिंबास प्रतीनुसार 5000 ते 18500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.