मक्याच्या दरात वाढ
कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवरील सायंकाळी 6.15 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यातील मक्याची एकूण आवक 40 हजार 078 क्विंटल इतकी झाली. यामध्ये अमरावती कृषी बाजारात सर्वाधिक 12 हजार 209 क्विंटल मक्याची आवक नोंदविण्यात आली. अमरावती बाजारात मक्यास किमान 1615 रुपये तर कमाल 1708 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, मक्याला सर्वाधिक बाजारभाव मुंबई कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. मुंबई बाजारात दाखल झालेल्या 187 क्विंटल मक्यास किमान 2500 रुपये तर कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याकडून अलर्ट
कांद्याच्या दरातही वाढ
राज्यातील कृषी बाजारात सोमवारी कांद्याची एकूण 1 लाख 69 हजार 131 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. कांद्याची सर्वाधिक 35 हजार 983 क्विंटल आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक बाजारात लाल कांद्याला किमान 400 रुपये तर कमाल 2008 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, कांद्याला सर्वाधिक दर सोलापूर कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. सोलापूर बाजारात दाखल झालेल्या 33 हजार 816 क्विंटल लाल कांद्याला कमाल 3300 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. सोमवारी कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
सोयाबीनची आवक पुन्हा लाखांच्या घरात
राज्यातील कृषी बाजारात आज सोयाबीनची एकूण आवक 1 लाख 54 हजार 143 क्विंटल इतकी झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक 1 लाख 12 हजार 983 क्विंटल आवक वर्धा कृषी बाजारात नोंदविण्यात आली. वर्धा बाजारात सोयाबीनला किमान 3288 रुपये तर कमाल 4614 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. सोयाबीनला सर्वाधिक दर वाशिम कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. वाशिम बाजारात दाखल झालेल्या 2535 क्विंटल सोयाबीनला किमान 4000 रुपये तर कमाल 5600 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. सोमवारी नोंदविण्यात आलेल्या उच्च दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





